श्री स्वामी समर्थांची माहिती
श्री स्वामी समर्थ म्हणजे “साक्षात परब्रह्म“
एक देवी महेश्र्वर | त्या परमेश्वराने मानवी देह धारण केला आणि तो परमेश्वर स्वामींच्या -
रुपात प्रकट झाला. मानव म्हणजे परमेश्वराच्या प्रतिभेचा सौंदर्यशाली अविष्कार, मानव
म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याचा प्रत्यय मानवी देह परमेश्वराला फार प्रिय, तो सारे अवतार मानवाच्या रूपातच घेतो.
सर्व विश्र्वचराचर सृष्टी व्यापून तो असला तरी प्रकट मानवाच्या रूपातच होतो.
स्वामींच्या रूपाने मानव म्हणजे परमेश्वर अवतीर्ण झाला.स्वामींचा जन्म कुठे झाला ?केव्हा झाला ? कथा
मोठी अद्भुत आहे. कथा दोन आहेत –
पहिली कथा -
श्री दत्तात्रयाचे पहिले अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ – हे शके १३५० अश्विन वद्य १२ रोजी गंगेत अदृश्य झाले.
श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार
श्री नृसिंह सरस्वतीह्रे शके १४४० मध्ये गुप्त झाले.श्रीशैल्य पर्वतावर गेले.एकांतात समाधी लावली. जवळजवळ ३०० वर्षे समाधी अवस्थेत होते. त्यांच्या शरीरावर वारूळ तयार झाल.पुढे
एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारूळावर पडली.स्वामींच्या मांडीवर कुऱ्हाडाचा घाव बसला.रक्त वाहू लागले. समाधीचा भंग झाला. श्री नृसिंह सरस्वतींची भंग होऊन पुन्हा प्रकट
झाले. लाकूडतोड्याचा अपराध जनतेला वरदान ठरला. श्री नृसिंह सरस्वती म्हणजे स्वामी.एका पारशी गृहस्थाने (कोलकत्ता येथील) आपण कोठून आलात ?हा प्रश्न स्वामींना विचारला.
स्वामिनी उत्तर दिले प्रथम आम्ही कार्रदळीवनातून निघालो.पुढे फिरत फिरत हरिद्वार,केदारेश्र्वर आणि भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे व गोदातटावरून देवालग्राम
राजूर-मंगळवेढे – मोहोळ – अक्कलकोट असा प्रवास झाला.
दुसरी कथा –
शके १०७१ चैत्र शुद्ध व्दितिया सूर्योदयापूर्वी दोन घटिका हस्तिनापुर जवळील छेलीग्राम धरणी दुभंगून अष्टवर्णीय स्वरुपात म्हणजे बटुरुपात स्वामी प्रकट झाले.प्रकट झाले तेव्हा लखलखीत अशी शेंदरी कांती जणू बाल गजाननाची
मूर्ती रावणाचे गर्वहरण करणारी वामन मूर्ती,असे मनोहारी दृश्य दिसले. चैतन्यस्वामी हे मूळ नाव,हिमालयात वास्तव्य,सर्व भारतभर भ्रमण.हजारो गावे पालथी घातली.चंचल भारती हे नावही प्रवासामुळे लाभले असावे.मग दिगंबरबुवा,
मग अक्कलकोटचे स्वामी,श्री स्वामी समर्थ हेच नाव, हे नावच स्वयंभु.एक मंत्र झाला. वरील जन्मतिथी प्रमाणे त्यांची जन्मकुंडली अंतरज्ञानी ज्योतिषी श्री नानाजी रेखी (नगर) यांनी स्वामींच्या समोरच मांडली.स्वामिनी कुंडली
पाहताच त्यावर तुळशीपत्र आले.स्वामिनी नानाजी रेखींच्या उजव्या हातावर हात ठेवताच नानाजींच्या हातावर विष्णुपद आले. हा प्रबळ पुरावा आहे.
दोन्ही कथांच्या आधारे : श्री नृसिंह सरस्वती हेच स्वामी समजले तरी, श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म शके १३८०. स्वामिनी समाधी घेतली शके १८०० रोजी म्हणजे स्वामींचे वय ४२१ वर्षांचे ठरते आणि स्वामींचा छेलीग्रामी जन्म शके
१०७१ गृहीत धरला व समाधी शके १८०० म्हणजे स्वामींचे आयुष्य ७२१ वर्षांचे ठरते. संशोधन जरूर व्हावे पण सारेच अद्भुत आहे हे लक्षात येईल.
कथा
श्री स्वामी समर्थांचा जन्म जसा अदभूत तसेच समाधी घेतल्यानंतरही श्री स्वामी समर्थ सदेह दर्शन देतात हे ही अदभूत !
“ हम गया नही जिंद है “ हे स्वामींचे अभिवचन ह्या वचनानुसार, श्री स्वामी आपल्या लाडक्या भक्तांला सदेह दर्शन देतात.
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे श्री स्वामीसमर्थांचे दुसरे अभिवचन. ह्या वचनानुसार श्री स्वामीसमर्थ आपल्या भक्ताची सतत काळजी घेतात.
श्री स्वामी समर्थ अवतार कार्याचा कालखंड ७२९ वर्ष. सर्वच अदभूत !
श्री स्वामी समर्थांनी अनेक शिष्योत्तम घडवले व त्यांचेकडून भक्तीमार्गाचा प्रसार करण्याचे कार्य करून घेतले.
१९६५ साली श्री स्वामी समर्थांनी श्री मुकुंद महेश्र्वर करंदीकर तथा नाना करंदीकर यांना सदेह दर्शन देऊन साद घातली,‘बेटा तू माझे कार्य कर. समाजात भक्ती पेरीत जा.’
श्री स्वामी समर्थ कार्यासाठी पूजनीय नाना करंदीकर यांनी उडी घेतली.त्यावेळी नानाचे वय वर्ष ४२ होते. ‘नाना’ नोकरीत उच्चपदावर काम करीत होते. उत्तम गृहिणी,२ सुकन्या व एक सुपुत्र
ह्यांनी नानांचा संसार पूर्णपणे फुललेला होता.
श्री स्वामी समर्थांनी ‘नानांना’ नोकरीचा त्याग करून लोकांमध्ये भक्ती पेरून लोकांची सेवा करण्याची आज्ञा केली. श्री स्वामी समर्थांची आज्ञा नानांनी आनंदाने मानली. “श्री स्वामी समर्थांनी” नानांना
रामदास होण्याची प्रेरणा दिली.
स्वामी आपण कोण आहात ?ह्या नानांच्या प्रश्नास ‘मी महारुद्र हनुमान आहे’ असे उत्तर देऊन हनुमंताचे रूप दाखविले. श्री स्वामी समर्थांनी ‘नानांना’ मार्ग दाखविला – ‘व्याधी ग्रस्तांना व्याधीमुक्त
कर’ अशी श्री स्वामी समर्थांची आज्ञा असल्याने श्री स्वामी समर्थांनी नानांना आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान दिले नानांनी स्वामी प्रेरणेने दिलेल्या औषधांनी अनेक व्याधीग्रस्त व्याधीमुक्त झाले व स्वामी
भक्तीत रममाण झाले. स्वामी भक्तीचा प्रसार होऊ लागला. श्री स्वामी कृपेचा अनुभव घेतलेल्या असंख्य व्यक्ति नानांच्या सहवासात येऊ लागल्या.
१९७६ साल उजाडले. श्री स्वामी समर्थांनी आज्ञा केली. ‘बेटा, अक्क्ल्कोटची पदयात्रा कर.’ श्री स्वामी समर्थ आज्ञेनुसार नानांनी अक्कलकोट पदयात्रा पूर्ण केली. ह्या पदयात्रेत नानांना दिव्य
अनुभव मिळाले.अक्कलकोटच्या पदयात्रेनंतर श्री स्वामी समर्थांनी नानांना ‘ ज्योतिष्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडव ’ असा आदेश दिला. श्री स्वामी समर्थांनी नानांना शक्ती दिली
व ज्ञान संपन्नही केले. नानांनी दिलेल्या उपासनेने अनेक व्यक्ती चिंतामुक्त झाल्या व त्यांच्या जीवनात आनंदाचे असंख्य दिप प्रज्वलित झाले.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या
राज्यांमधील कानाकोपऱ्यातून असंख्य व्यक्ती व्याधी व समस्या निवारणार्थ नानांकडे येऊ लागल्या. स्वामी प्रसाराची वेल बहरू लागली.१९७९ साल उजाडले –
श्री स्वामी समर्थांनी नानांना आज्ञा केली ‘बेटा, जगन्नाथाला चल’—ठाणे ते जगन्नाथपुरी ह्या पदयात्रेची सिद्धता झाली. खरतर नानांना पायी प्रवासाची सवय नव्हती. पहिला वर्ग, वातानुकुलीत वर्ग,
यांनी प्रवास करणारा सुखवस्तु नानांना पायी प्रवास ही कल्पना खरतर कष्टमय वाटली असती पण नानांवर श्री स्वामी समर्थांचा कृपशिर्वाद होता व पायी यात्रेची प्रेरणा हे स्वामी समर्थांची होती.
शिवाय स्वामी म्हणाले ‘बेटा चल’ म्हणजे प्रवासात स्वामी बरोबर असणारच, म्हणूनच नानांनी ठाणे ते जगन्नाथपुरी पदयात्रा करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले.