|| सकल जन हिताय ||
कलियुगातील आत्मोन्नती व समृद्धी यांचे साधन 'दान' आहे
श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे संस्थापक पूजनीय मुकुंद महेश्वर करंदीकर उर्फ नाना करंदीकर हे अध्यात्मातील अधिकारी होते. त्यांना समाजात भक्तिमार्गाचे बीज पेरण्याचा आदेश दिला.श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी लोणावळा,नांगरगाव येथे श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला.
वेळोवेळी येणाऱ्या अडचणी,संकटे यांच्या परीहारासाठी पूजनीय नानांनी जप,सोपी व्रते आणि सहज साध्य उपासना सांगितल्या.परीस्थित चांगला बदल होण्यासाठी उपासनेचा आधारच उपयुक्त आहे.व्यापक आणि त्वरित परिणामांसाठी सांघिक उपक्रम ह अधिक परिणामकारक उपाय आहे,हे त्यांनी लोकांना पटवून दिले.
देणगी, अभिषेक, अखंड नंदादिप, महानैवेद्य
---------------------------------------------------------
देणगी – आपण रू. ५०० पासून कितीही रक्कम देणगी म्हणून देऊ शकता. देणगीची पोच पावती आपणांस पाठविण्यात येईल. सर्व देणग्या Income Tax Act कलम 80 - G खाली करमुक्त होतात.
अभिषेक - आपल्या नावाने श्री स्वामी समर्थांना सकाळी ५.३० वाजता अभिषेक केला जातो. श्री स्वामी समर्थांना आपले व आपल्या कुटुंबाचे हित चिंतून आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रार्थना केली जाते.
अभिषेक मुल्य रू. ५० आहे.
अखंड नंदादिप - आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख, शांती व स्वास्थ्य लाभावे तसेच आपल्या समस्यांच्या निवारणार्थ श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली जाते. व नंदादिप प्रज्वलीत केला जातो.
१ महिन्यासाठी नंदादिप रू. ७५१ /-
१ वर्षासाठी नंदादिप रू. ९००१ /-
अखंड नंदादिप योजनेत सहभागी झाल्याने मुलांच्या अभ्यासात उत्तम प्रगती होते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.
महानैवेद्य - आपण निश्चित केलेल्या शुभदिनी श्री स्वामी समर्थांना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविला जातो. आपल्या कुटुंबियांचे जीवन सुखी, संपन्न व वैभवशाली व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली जाते. रू. २००१ भरून आपण या योजनेत सहभागी होऊ शकता.
आपल्या उत्पनांतील २० टक्के भाग ईश्र्वरीय कार्यासाठी खर्च करावा. त्यामुळे प्रारब्ध शुध्द होते व लक्ष्मीची कधीही कमतरता पडत नाही.
वरील योजनांमध्ये सहभागी होऊन आपण श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा.